पोलिसांनी मारहाण केली म्हणून शेतकऱ्यांनी केले विष प्राशन





As-the-police-beat-him-the-farmers-poisoned-him

पोलिसांनी अपमानास्पद वागल्याने व घरी जाण्यास स्वतः च्या गावात मज्जाव केल्याने ,शेतावर माल काढणी करून घरी परतणारे शेतकरी दाम्पत्य ने विष प्राशन केले आहे. यामध्ये पत्नी चा मृत्यू तर पती गंभीर अवस्थेत आहेत.
आपल्याच शेतावर सकाळी जाऊन शेतातील माल काडून तो मार्केट ला पाठवून स्वतः च्या गावात घरी परतणाऱ्या शेतकरी दाम्पत्याला गावात नाकाबंदी ला असणाऱ्या ओतूर पोलिसांनी जाऊ न दिल्याने व लाकडी फटके मारल्याने अपमान सहन न झाल्याने दोन्ही शेतकरी पती पत्नी नि विष पिऊन आत्महत्या करायचा गंभीर प्रकार जुन्नर किल्ले शिवनेरी जुन्नर तालुक्यातील उंब्रज गावात घडली आहे. यामध्ये पत्नी चा मृत्यू झाला असून पती गंभीर आहेत .दिनांक8 जुलै रोजी दुपारी सदर घटना घडली आहे.
रोहिदास शिंगोटे व अनुजा रोहिदास शिंगोटे असे हे शेतकरी दाम्पत्य सकाळीचआपल्या शेतावर कामा साठी व माल काढण्यासाठी गेले होते .यावेळी ते परतत असताना उंब्रज न 1 या गावाच्या वेशिजवळ ओतूर पोलिस स्टेशन चे पोलीस नाकाबंदी करत होते .
यावेळी त्यांचे मध्ये वाद झाला व गावातील पोलिस पाटील व सरपंच तेथे उपस्थित असताना सुद्धा सदर लोकांना घरी जाऊ देण्यास मज्जाव करण्यात आला होता . 




No comments