बार्शी । क्वारंटाइन सेंटर मधून चार रुग्णांनी काढला पळ

Barshi-Four-patients-escaped-from-the-quarantine-center
उपचार सुरू असलेल्या चार रुग्णांनी बार्शी येथील गाडेगाव रोड येथे असणाऱ्या 
क्वारंटाइन सेंटर मधून पळ काढल्याची घटना समोर आली असून या चौघांविरुद्ध पोलीस ठाण्यात 
 आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा ही दाखल करणेत आला आहे. 
दरम्यान या रुग्णांची तपासणी करून त्यांचेवर उपचार सुरू असताना त्यांनी धूम ठोकली असल्याची माहिती समोर येत असून त्यांचेवर मुलींच्या वसतिगृहात केलेल्या कोव्हीड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू होते. याबाबत वैद्यकीय अधिकारी अनिरुद्ध भुजबळ यांनी तक्रार दिली आहे. 
ग्रामीण भागात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे असे असताना रुग्णांनी असे वर्तन केल्याने सर्वच प्रशासकीय यंत्रणांना घाम फुटला आहे. 

No comments