दुग्ध व्यावसायिकांसाठी मोठी बातमी


दूधाचे रुपांतरण दूध भुकटीत करण्याची योजन्याला  31 जुलैपर्यंत मुदतवाढ

५१ कोटी २२ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. संपूर्ण योजना कालावधीत एकूण ६ कोटी लिटर दूध स्विकृत केले जाणार असून त्यापोटी 190 कोटी इतका निधी वितरित केला जाणार आहे.

एप्रिल 2020 पासून प्रतिदिन अतिरिक्त ठरणाऱ्या दुधापैकी 10 लाख लिटर दुधाचे रुपांतरण दूध भुकटीत करण्याची योजना सुरु केली होती.योजना एप्रिल व मे या 2 महिन्यांसाठी राबविण्यात आली होती.

या योजनेस 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र राज्यातील अतिरिक्त दुधाची परिस्थिती अद्यापही सुधारलेली नसल्याने 8 जुलैच्या मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत योजनेस १ महिन्याने मुदतवाढ देण्यात आली आहे.


No comments