सातबारा उताऱ्यात बदल होणार; 1 ऑगस्टपासून होणार अंमलबजावणी
सातबारा उताऱ्यात बदल होणार; 1 ऑगस्टपासून होणार अंमलबजावणी; पहा काय बद्द्ल
1️⃣ खाते क्रमांक यापूर्वी इतर हक्काच्या रकान्यात नमूद केला जात असतो पण आत्ता तो आता खातेदार अथवा खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जाणार आहे.
2️⃣ शेती क्षेत्रासाठी हे.आर.चौ.मी. आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी.हे एकक दर्शविले जाणार आहे.
3️⃣ मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजा अथवा ई -कराराच्या नोंदी कंस करून दर्शविल्या जात होत्या पण आत्ता कमी केलेली नावे व नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषा मारून खोडून दर्शविण्यात जाणार आहे.
4️⃣ क्षेत्र अकृषिक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना न. 12 ची आवश्यमकता नाही. अशी सूचना त्यावर छापण्यात येणार आहे.
5️⃣ नमुना 7 वर नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले (प्रलंबित असे पर्यंत) प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याच्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात येणार.
6️⃣ गावाचे नावासोबत एलजीडी कोड ( लोकल गर्व्हेमेन्ट डिरेक्टरी) कोड असणार आहे आणि लागवडी योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र यासोबत एकूण क्षेत्र (अ+ब) स्वतंत्ररीत्या दर्शविण्यात येणार आहे.
7️⃣ भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एकाही फेरफार प्रलंबित नसल्यास प्रलंबित फेरफार नाही असे दर्शविण्यात येणार आहे.
8️⃣ नमुना 7 वर नोंदविण्यात आलेला शेवटचा फेरफार क्रमांक व त्याचा दिनांक इतर हक्क रकाण्याचे खाली शेवटचा रकान्यात दर्शविण्यात येणार - सर्व जुने फेरफार क्रमांक नवीन रकान्यात एकत्रितरीत्या दर्शविण्यात येणार आहेत.
9️⃣ शेती क्षेत्रासाठी व बिनशेती क्षेत्रासाठी स्वतंत्र गाव नमुन्यात बदल होणार आणि बिनशेती क्षेत्रासाठीच्या नमुनावर 12 छापला जाणार नाही.
1 no.....
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete