मोटर सायकलवरून जाणारा 91 हजाराचा गुटखा पकडला
दोघांविरूध्द गुन्हा दाखल
हुलजंती ते मंगळवेढा या मार्गावर मोटर सायकलवरून बेकायदेशीररित्या 91 हजार 484 रुपये किमतीचा वेगवेगळया कंपनीचा गोवा गुटखा वाहतूक करताना पोलिसांनी पकडून मोटर सायकलस्वार अझहर अबकर आतार (वय 24),जिलानी महेबूब तांबोळी (वय 24) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची हकिकत अशी,दि. 26 रोजी 5.15 वा. कर्नाटक राज्यातून मंगळवेढयाकडे एम एच 13 डी.ई.1745 या क्रमंाकाच्या आर्मी रंगाच्या बजाज मोटर सायकलवरून शासनाने बंदी घातलेला विमल पानमसाला,सेंटेड तंबाखू व अन्य वेगवेगळया कंपनीचा गोवा गुटखा असा 91 हजार 484 रुपये किमतीचा मुद्देमाल घेवून जात असताना हुलजंती -मरवडे रोडवर मुद्देमालासह मोटर सायकल जप्त केली.या प्रकरणी पोलिस नाईक हरीदास सलगर यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर वरील दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस हवालदार सुनिल गायकवाड करीत आहेत.
Post Comment
No comments