विरोधकांना आपलेसे करणारे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील !
💐💐💐💐💐💐💐💐
मी दररोज पहाटे पाच वाजता उठतो परंतु आज थोडासा उशीरा उठलो आणि क्रिडा संकुलात व्यायामसाठी चाललो.संकुलाच्या थोडस अलिकडे माझ्या पाठीमागून पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ गाडी माझ्या बाजुला येऊन थांबली.आणि मी गाडीकडे पाहिले.त्यावेळी गाडीच्या पुढील सिटवर माजी उपमुख्यमंत्री माजी खासदार मा विजयसिंह मोहीते पाटील बसले होते. मी माझी स्कुटी थांबवली व नमस्कार केला. आणि त्यांच्या जवळ गेलो.हसतमुखाने दादांनी माझी आस्थेवाईकपणे विचारपूस केली.माझा दिनक्रम जाणुन घेतला.तब्येतीची काळजी घे म्हणून व्यायाम करण्याचा सल्ला दिला.मी गेल्या 25 वर्षांपासून सामाजिक,राजकीय क्षेत्रात काम करत असताना,अनेक वेळा माझे वैचारिक मतभेद मोहीते पाटील कुटुंबातील लोकांच्या बरोबर झाले.मी कायम त्यांच्या विरोधात भुमिका घेतली.अनेक वेळा वाद विवाद झाले. परंतु मोठे दादासाहेब यांनी कधीही मला आपला,परका,विरोधक असे जाणवु न देता विरोधकांना सुद्धा आपल्या कुटुंबातील सदस्य समजून आपलेपणाने गाठ पडेल तिथे थांबून माझी व माझ्या कुटुंबाची कायम काळजीपूर्वक विचारपुस करून आपलेपण दाखवून दिलं.अशा मनाने मोठे असणारे आपल्या गावालाच कुटुंब माननारे विजयदादा यांच्या बदल मला सुद्धा दादा आपल्या कुटुंबातील व घरातील मोठे माणुस आहेत असे वाटते. आदरणीय दादासाहेब धन्यवाद.आम्हाला तुम्ही कधीच परके वाटत नाही.आजही आपणास पाहीले की आदराने बोलावे वाटते....
मी आणि तेजोमय हास्य मुद्रा लाभलेले मोठे दादा.आज दि 14/7/2020 सकाळी क्रिडा संकुल समोरील रस्त्यावर सकाळी ६-००बा. द ग्रेट भेट मग मला पण सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही.
खोडील
*राजाभाऊ खिलारे*
पश्चिम महाराष्ट्र.अध्यक्ष
(दलित महासंघ)
Hi
ReplyDeleteI want to advertise my business with velapur live.
Pl tell me process
Charges
Mob 9503771139