पिस्टन ऑटो केअरला खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची सदिच्छा भेट



माढा लोकसभेचे लोकप्रिय विद्यमान खासदार रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी पिस्टन ऑटो केअर या वर्कशॉपला अकलूज येथे सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांचा सन्मान पिस्टन ऑटो केअरचे युवा उद्योजक विराज माने देशमुख यांनी केला यावेळी भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष श्री. श्रीकांतदादा देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.

पिस्टन ऑटो केअर मार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांची विराज माने देशमुख यांनी खासदार महोदयांना माहिती दिली. सर्व ब्रॅण्डच्या वाहनांसाठी सेवा देणारे अकलूज भागातील एकमेव अत्याधुनिक वर्कशॉप असलेल्या आणि अगदी कमी कालावधीत आपल्या उत्तम सेवेसाठी नावलौकिक मिळवल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि युवा उद्योजक विराज माने देशमुख यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


No comments