निमगाव मध्ये हातभट्टी विकणाऱ्या इसमावर पोलिसांची कारवाई


आज दिनांक 25/07/2018 रोजी वेळापूर पोलीस पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, निमगांव म.ता.माळशिरस या गावी  विश्वास पोपट बोडरे हा त्याचे रहाते घरासमोरील नारळाचे झाडाखाली हात भट्टी दारूची बेकायदेशीररीत्या चोरुन विक्री करीत आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाली.

Police-take-action-on-provisional-case


 मौजे निमगांव (म) ता.माळशिरस येथे  खाजगी वाहनातुन वेळापूर पोलिसांनी जाउन पाहिले असता सदर ठिकाणी एक इसम हा पांढरे रंगाचे प्लस्टीकचे कंड घेवुन बसलेला दिसला. त्याचा आम्हांस प्रोव्हीशन गुन्हयाचा संशय आल्याने आम्ही त्यास गराडा घालून जागीच पकडले ती वेळ सकाळी 11.00 वा. ची होती. लागलीच पंचासमक्ष सदर इसमास नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव विश्वास पोपट बोडरे वय 24 वर्षे रा. निमगांव म. ता. माळशिरस जि. सोलापुर असे सांगितले आहे.             लागलीच पंचासमक्ष सदर पकडलेल्या इसमाचे ताब्यातील पांढरे रंगाचे प्लस्टीक कंड तपासुण पाहता त्यात पंचनामेत नमूद वर्णनाप्रमाणे आंबट उग्र घाण वासाची 5 लिटर हातभटटी.दारू प्रत्येकी एक लिटर किं.50.रू असा एकुण किं.250/- रूपयेचा प्रोव्ही.गुन्हयाचा माल मिळुन आल्याने तो पोहेक/531 जाधव यांनी पंचासमक्ष जप्त करून घेवुन जप्त मालातुन शम्पल करीता एका काचेच्या 180 मि.ली.च्या चपटया बाटलीत काढुन घेवुन जप्त मालास व शम्पल बाटलीस आम्हा पंचाचे व पोलीसांचे सहयांचे कागदी लेबल लावले आहे.तरी आज दिनांक 25/07/2020 रोजी सकाळी 11/00 वा.चे सुमारास आरोपी विश्वास पोपट बोडरे वय 24 वर्षे रा. निमगांव म. ता. माळशिरस जि. सोलापुर  याने आपल्या ताब्यात बेकायदा,बिगरपास, बिगरपरमिटने आंबट उग्र घाण वासाची 5 लिटर हातभटटी.दारू एकुण किं.250/-रूचा माल जवळ बाळगलेल्या परीस्थितीत मिळुन आला आहे.म्हणून त्याच्याविरूध्द महा. प्रोव्ही. का. कलम 65(र्इ) प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दाखल करणेत आली आहे. 

No comments