सोलापूर जिल्ह्यात कलम ३७(१) लागू


Section-37-1-applies-in-Solapur-district

सोलापूर जिल्ह्यात कलम ३७(१) लागू करण्यात आले आहे. महानगरपालिका हद्द वगळून ग्रामीण भागात हे कलम दि. ०२ ऑगस्ट पर्यंत लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) व ३७ (३) चे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी अजित देशमुख यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार शस्त्रे झेंडा झेंडा लावलेली काठी याचबरोबर शरीराला इजा करणारी साधने ज्वालाग्राही पदार्थ सोबत बाळगण्यात व वाहून नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रेत यात्रा, कोणत्याही व्यक्तीचे फोटो प्रदर्शन, घोषणाबाजी, रॅली, सभा यांसारख्या गोष्टींवर प्रतिबंध घालण्यात आला आहे.
हा आदेश अत्यावश्यक सेवा, सरकारी नोकर, जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांसारख्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या व्यक्तींना लागू होणार नाही.

No comments