फळबागांच्या नुकसानीपोटी 50 कोटीची तरतूद





Provision-of-Rs-50-crore-for-loss-of-orchards

3 जून रोजी आलेल्या चक्रीवादळात कोकणातील फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. बागायती शेती उध्वस्त झाल्याने सरकारकडे मदतीची मागणी होत होती.
 या नुकसान भरपाईसाठी नुकतीच 50 कोटी रुपयांची तरतूद सरकारकडून करण्यात आली असून त्याबाबतचे आदेशही काढण्यात आले आहेत.

यांना मिळणार फायदा? 
आंबा, काजू, नारळ, कोकम, सुपारी, चिकू या पिकांना याचा लाभ होणार आहे. रोजगार हमीचा लाभ घेणारे आणि न घेणारे असे दोन्ही शेतकरी यासाठी पात्र असतील . 
कोकणातील रायगड, रत्नागरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या सर्व जिल्ह्य़ातील बागायतदारांना याचा लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
 दरम्यान, लाभार्थी शेतकऱ्याच्याा सातबारा उताऱ्यावर फळबाग लागवडीची  नोंद घेतल्याा शिवाय अनुदान देता येणार नाही असे आणि यांसारखे इतर निकषही शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ घेण्यासाठी पूर्ण करावे लागणार आहेत.





No comments