अन चिमुकलीच्या एका फोनवर पोहोच झाले अन्नधान्याचे मदत किट




A-food-aid-kit-was-reached-on-a-phone-from-little-girl

आज सकाळी गरुड बंगला वेळापूर येथे कामानिम्मीत मी (डॉ. तुकाराम ठवरे ) व माझे सहकारी श्री.जब्बार मुलाणी मा.श्री. चेअरमन उत्तमरावजी जानकर साहेंब यांचेशी चर्चा करीत असताना अचानक एक फोन आला, फोनवर एक   लहान मुलीचा आवाज आला चेअरमन साहेबांनी विचारणा केली असता तिने आपले नाव  मन्नत असुन मी मांडवे येथे राहते व सध्या घरातील अन्नधान्य संपल्याचे सांगीतले व काहीतरी मदत करा असे म्हणताच साहेब बोलले बाळा काय पाहिजे तेव्हा ती निरागस मुलगी बोलली साहेब खायला धान्य नाही, लगेच साहेबांनी धान्य पोहच करण्यास  सांगितले हा प्रसंग पाहुन तालुक्यातून आपल्या समस्या घेऊन आलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान दिसत होते.
    मांडवे ता. माळशिरस येथे मन्नत निसार शेख हिच्या घरी मा. जानकर साहेबांच्या वतीने अन्नधान्य व किराणा साहित्य पोहच केले यावेळी मा.श्री. मारूती देशमुख ( नगरसेवक माळशिरस ),मा. श्री.डॉ. तुकाराम ठवरे ( माजी उपसरपंच खुडूस ) मा.श्री.जब्बार मुलाणी (उद्योजक वेळापूर ) मा.श्री. सौरव बागनवर सर ( एकशिव ) आदी सह शेख कुटूंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते.



No comments