पुणे पंढरपूर पालखी मार्ग । खासदार नाईक निंबाळकर यांच्या बैठकीत अनेक प्रश्न लागले मार्गी



Pune-Pandharpur-Palkhi-Marg-MP-Naik-Nimbalkar-meeting-raised-many-questions

पुणे पंढरपूर असणारा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग बाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी गेल्यानंतर माढा मतदार संघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी नॅशनल हायवे चे अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रशासन व्यवस्थेचे अधिकारी व शेतकरी यांची एक बैठक माळशिरस येथे घेतली.
 या बैठकीमध्ये अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. याबाबत या बैठकीला उपस्थित असणारे प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष के पी काळे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क प्रतिनिधीने संपर्क केला असता त्यांनी खालील माहिती दिली आहे -

माळशिरस नगरपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांचा गुणांक वाढवून मिळणार
खेडे गावातील नागरिकांच्या जमिनीला ज्यादा चा भाव व नगरपंचायत हद्दीतील जमिनीला कमी भाव अशी तक्रार माळशिरस नगरपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांची होती. या प्रश्नावर बोलताना खासदार नाईक निंबाळकर यांनी खेडेगावातील जमिनीच्या गुणांपेक्षा नगरपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनी ला जादाचा गुणांक मिळणार असल्याचे जाहीर केले.

वेळापूर ला बायपास होणार
वेळापूर या ठिकाणाहून पालखी मार्गाच्या दुतर्फा पुरातत्त्व विभागाची मंदिरे आहेत हा एक ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा रस्त्यासाठी नष्ट केला जाऊ शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी नक्कीच बायपास होणार असल्याचे नॅशनल हायवे चे अधिकारी यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांच्या उताऱ्यावरील इतर अधिकार मधील पालखी मार्गाचे नाव कमी होणार
ज्या ठिकाणी मुख्य पालखी मार्ग रुंदावणे अशक्य आहे अशा ठिकाणी बायपास चा पर्याय वापरण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर इतर अधिकारांमध्ये पालखी मार्गाचे नाव आले आहे त्यामुळे त्यांना व्यावहारिक घडामोडी करताना त्याची अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे लवकरच इतर अधिकार मधील पालखी मार्गाचे नाव कमी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

सदर बैठकीला आमदार राम सातपुते, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह प्रांताधिकारी शमा पवार , तहसीलदार अभिजीत पाटील त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी सोलापूरचे अध्यक्ष श्रीकांत देशमुख, धैर्यशील मोहिते-पाटील, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यासह पुणे पंढरपूर पालखी मार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केपी काळे आदी उपस्थित होते.


No comments