स्वाभिमानीने टँकर फोडून हजारो लीटर दूध रस्त्यावर सोडलं; आंदोलनाला तीव्र सुरुवात
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर आंदोलनाला सांगली, सोलापूर जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाळवा तालुक्यातील येलूर फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पहाटेच्या सुमारास गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला. गोकुळ दूध संघाचा टँकर 25 हजार लिटर दूध घेऊन मुंबईला जात होता.
मागण्या
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूध दर वाढीसाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.
आज होणार बैठकदुधाला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नेते आणि दूध उत्पादक प्रतिलिटर अनुदान द्यावे अशी मागणी करत आहेत. त्यावर चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे.- दुग्धविकासमंत्री सुनील केदार
Post Comment
No comments