माळशिरस । तहसील कार्यालयातील लिपिकास मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल


Malshiras-Tehsil-office-clerk-beaten

माळशिरस तहसील कार्यालयात लिपिक असणाऱ्या एकास मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणले बद्दल माळशिरस पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. जयलाल बारवाल असे लिपिकाचे नाव असून त्यांनी याबाबत माळशिरस पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 
त्यांचे फिर्यादीनुसार, 
मी जयलाल छबुसिंग बारवाल वय 31वर्ष व्यवसाय लिपीक (तहसिल कार्यालय माळशिरस) रा.पळसखेडा पिंपळे ता.भोकरदन जि जालना सध्या रा.नक्षत्र काँम्प्लेक्स म्हवड रोड माळशिरस ता.माळशिरस पोलीस ठाणेस समक्ष हजर राहुन फिर्यादी जबाब देतो की,      मी वरिल ठिकाणी माझी प्त्नी जयमाला,व मुलासह एकत्रात राहणेस असुन मी नोकरी करून येणारे उत्पन्नावर माझे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. आज दि.18/07/2020रोजी मी सकाळी 10/15वाजता तहसिल कर्यालय माळशिरस येथील  अभिलेख कक्षात काम करत असताना  11/30वा.चे सुमारास माझ्या ओळखीचा शंकर शिवदास खडाखडे हा अभिलेक कक्षातील माझे टेबलचे समोर येवुन तो मला म्हणाला की, फेरफार द्या असे म्हणाल्या नंतर मी त्यास म्हणालो की, तुमच्या फेरफारची पावती दाखवा. त्यानंतर मी तुम्हाला फेरफार देतो. असे म्हणाले नंतर शंकर खडाखडे मला म्हणाले की, फेरफारची पावती माझ्याकडे नाही. तुम्ही मला रजिस्टर द्या मी माझे घेतो. त्यानंतर मी त्यांना म्हणालो की, तसे मला करता येणार नाही त्यावेळी त्यांनी चिडुन जावुन मला शिवीगाळ, दमदाटी केली. मी त्यांना म्हणालो की, मी सरकारी काम करत असुन तुम्ही मला विनाकारण शिवीगाळी करू नका. असे म्हणुन मी माझा मोबाईल खिशातुन काढुन निवासी नायब तहसिलदार श्री. देशमुख यांना फोन करत  असताना शंकर खडाखडे यांनी माझी काँलर धरून ओढले व मला कानाखाली चापट मारली. त्यावेळी आमचे भांडणाचा आवाज ऐकुन आमचे आँफिस मधील संजय येदा डावरे रा.बागेची वाडी माळशिरस ता. माळशिरस,पवन चंदनशिवे रा. माळखांबी ता.माळशिरस हे तेथे आले व त्यांनी आमची भांडणे सोडवासोडव केली. त्यानंतर शंकर खडाखडे हे मला म्हणाले की,तु बाहेर ये मी तुला बघुन घेतो असे म्हणुन निघुन गेला.तरी मी करित असलेल्या शासकीय कामात शंकर शिवदास खडाखडे रा.श्रीनाथनगर माळशिरस याने अडथळा आणुन शिवीगाळी,दमदाटी करून हाताने मारहाण केली आहे. म्हणुन माझी त्याचे विरूध्द फिर्याद आहे.
यावरून माळशिरस पोलिसांत शंकर शिवदास खडाखडे रा.श्रीनाथनगर माळशिरस  यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता १८६० चे ३२३, ३५३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास माळशिरस पोलीस करीत आहेत. 


No comments