दुधाला भाव मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना ठेवले दुधात
व्यक्तीच्या समस्या कमी व्हाव्यात म्हणून गणपतीला पाण्यात ठेवले जाते, परंतु दुधाला चांगला भाव मिळावा म्हणून छावा संघटनेच्या वतीने चक्क मुख्यमंत्र्यांना दूधात ठेवण्यात आल्याची घटना घडली आहे.
छावा संघटना दुध आंदोलन मध्ये सहभागी आहे तसेच दुध दरवाढ आंदोलनाला पाठिंबा देत आहे. पुर्वी कोणतेही मोठे संकट आले किंवा काही मागण्या असतील तर देव पाण्यात ठेवायची प्रथा होती.
सध्या स्थितीमध्ये शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत, दुधाला भाव नाही. बिसलेरी पाणी बाटली २० रूपये लिटर तर दुध शेतकऱ्यांकडून १६- १७ रू. ने खरेदी केलं जातं आहे. जनावरांचे संगोपन खाद्य व मेहनतीवर अन्याय होत आहे. मुख्यमंत्री यातुन मार्ग काढन्यासाठी शेतकरी बांधवांना ५ ते १० रूपये अनुदान प्रत्येक शेतकरी बांधवांच्या थेट खात्यात जमा करावेत म्हणुन छावा संघटनेच्या वतीने दुधात ठेवून हि मागणी केली आहे.
Post Comment
No comments