विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चोरी, रुक्मिणी मातेच्या गळ्यातील मंगळसूत्र गेले चोरीला


Theft-at-Vitthal-Rukmini-temple-Mangalsutra-on-Rukminis-mothers-neck-stolen

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिंदे या गावात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चोरी झाली असून चोरट्यांनी रुक्मिणी मातेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले आहे.
याबाबत मंदिराचे पुजारी बबन घनवट यांनी चाकण पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीची तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 17 जुलै रोजी सकाळी सात ते संध्याकाळी आठ या वेळात ही घटना घडली असून चोरट्यांनी भर दिवसा मंदिरात प्रवेश केला व रुक्मिणी मातेच्या गळ्यातील सोन्याचे सुमारे 15 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दिवसाढवळ्या चोरून नेले आहे.

No comments