माझ्यावर पीएचडी करण्यासाठी 10 ते 12 वर्ष लागतील- शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गेली 50 वर्ष राजकारणात आहेत. पण तरीही त्यांचा पक्ष 10 पेक्षा जास्त खासदार पाहू शकला नाही. तरीही ते राजकारणात कायम केंद्रस्थानी असतात. त्यामुळे मला त्यांच्यावर पीएचडी करण्याची इच्छा असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. यावरून शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.
चंद्रकांत पाटलांना माझ्यावर पीएचडी करण्यासाठी 10 ते 12 वर्षे लागतील, असा टोला शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. ते राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या युवा संवाद कार्यक्रमात बोलत होते.
No comments