तृप्ती देसाई अकोल्यात आल्या तर मुंडन करून पाठवू

 तृप्ती देसाई यांनी हिंमत असेल तर अकोल्यात येऊन दाखवावं. त्यांचं मुंडन करुन परत पाठवू, अशी टीका अकोल्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्या स्मिता आष्टेकर यांनी केली आहे.

कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोल्यात आज मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर निषेध सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी बोलताना स्मिता आष्टेकर यांनी तृप्ती देसाईंवर खालच्या पातळीवर टीका केली आहे.

No comments