शिवजयंतीनिमित्त निमगाव येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
छ. शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून राजे प्रतिष्ठान व पवार तालीम निमगाव ता माळशिरस यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि 19 रोजी दुपारी तीन वाजता खंडोबा मंदिर पाठीमागे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले असल्याची माहिती पवार तालीमचे वस्ताद गोरख पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
राजे प्रतिष्ठान व पवार तालीम यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे छ शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव येथे कुस्ती मैदान आयोजित केले जाते या मैदानामध्ये रुपये 50 पासून ते 50 हजार रुपये किमतीच्या कुस्त्या लावल्या जातात या कुस्ती मैदानास सोलापूर जिल्ह्यासह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणाहून नामवंत मल्ल हजेरी लावतात कुस्तीचे मैदान पाहण्यासाठी कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित असतात
या कुस्ती मैदानास सुग्रीव निंबाळकर मॅनेजिंग डायरेक्टर ग्रीन अग्रो इंडिया लिमिटेड बारामती ,सुनील लावंड पार्थ ऍग्रो मिल्क प्रोजेक्ट पानिव, डॉ सचिन शेंडगे ,प्रताप ढेरे ,सुरेश पाटील, विठ्ठल इंगळे, अशोक घोगरे, सूर्यकांत पाटील, विलास पाटील,नागनाथ मगर, सोमनाथ मगर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या मैदानात होणाऱ्या कुस्त्या सकाळी 11 ते 1 या वेळेत पवार तालीम निमगाव येथे नेमण्यात येतील नेमण्यात आलेल्या कुस्त्या मैदानात लावले जातील यामुळे सर्व मल्लांनी वेळेवर हजर राहावे असे आवाहन वस्ताद गोरख पवार यांनी केले आहे.
No comments