शिवजयंती हा सण प्रत्येक घराघरात व्हावा
शिवभक्तांची सोशल मिडीयातुन सर्व जनतेला आव्हान.
फेब्रुवारी महिना सुरु झाला कि सर्वजन शिवजयंतीच्या तयारीला लागतात.सर्व गावात व शहरात ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जातेच.परंतु आपल्या छञपती शिवाजी महारांजाची ही शिवजयंती प्रत्येक घराघरात साजरी करावी व यंदाच्या शिवजयंतीपासून एक प्रथा पाडून घेऊ...
ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीपुजनाला घराबाहेर सकाळी व संध्याकाळी दिवे लावतो त्याचप्रमाणे या वर्षापासून शिवजयंतीला आपण आपल्या घरी दिवे लावावेत व घरावर भगवा झेंडा लावावा.तसेच घराबाहेर रांगोळी काढावी, यामुळे शिवजयंतीच्या सणाचे महत्व आपणास व भावी पीढीस कळेल व छञपती शिवाजी महारांजाची शिकवण घराघरात रुजवली जाईल तसेच १९ फेब्रुवारी फक्त जयंती न राहता महाराष्ट्रातील एक मोठा सण व्हावा . अशा प्रकारे शिवजयंती हा मोठा सण व्हावा व शिवजयंती हा सण घराघरात व्हावा.
शिवजयंती दिनी शाळांना फक्त सुट्टी देऊन चालणार नाही तर १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांप्रमाणेच १९ फेब्रुवारी शिवजयंतीचा कार्यक्रम प्रत्येक शाळेत साजरा झाला पाहीजे.अशा प्रकारे यावर्षापासुन शिवजयंती हा सण साजरा करण्याचे आव्हान सोशल मिडीयातुन शिवभक्तांनी भारतवासियांना केले आहे.
आपल्या सर्व समाजबांधवांनी या प्रथेला सुरु करण्यासाठी सर्वानी वरील प्रमाणे शिवजयंती साजरी करावी. तसेच गावात व परिवारात ही प्रथा सुरु व्हावी व शिवजयंती हा सर्वासाठी मोठा सण व्हावा .व आपल्या छञपती शिवाजी महाराजांची शिकवण घराघरातव मनामनात पोहोचवणे म्हणजेच ही खरी शिवजयंती होय.
अशा प्रकारे छञपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरा करण्याचे आव्हान शिवभक्तातुन सोशल मिडीयात होत आहे.
No comments