वेळापूरात तीन दुकाने फोडली, परिसरातील चोरीसत्र सुरूच
वेळापूर तालुका माळशिरस या ठिकाणचे चोरी सत्र दिवसेंदिवस अधिकच बळकट होत असून हे चोरी सत्र थांबवण्यास वेळापूर पोलीस सपशेल अपयशी होताना दिसत आहेत.
आज सोमवार च्या पहाटे वेळापूर बस स्थानक नजीक असणाऱ्या नाईक शॉपिंग सेंटर मधील एक इलेक्ट्रॉनिक दुकान व एक मोबाईल शॉपी त्याच शेजारील एक किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले असून अतिशय चलाखीने व स्मार्ट पणे ही दुकाने फोडून या दुकानातील मालमत्तेची चोरी करण्यात आली आहे.
जैन मंदिर येथील दानपेटी फोडल्यानंतर ज्याप्रकारे चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची हार्डडिस्क चोरून नेली होती त्याचप्रमाणे आजच्या दुकान फोडीतील किराणा दुकानातील सीसीटीव्हीचे फुटेज या चोरांनी नष्ट केले आहे. त्यामुळे या दोन्ही चोरीमध्ये नक्कीच काहीतरी संबंध असल्याची चर्चा वेळापुरात रंगली आहे.
नाईक शॉपिंग सेंटर मधील विश्वजीत फोटो स्टुडिओ व इलेक्ट्रिक शॉपचे छत उचकटून चोरट्यांनी वरून खाली येऊन या दुकानातील हार्ड डिस्क व इलेक्ट्रिक सामान चोरून नेले असून दुकानातील केबल्स तोडून टाकले आहेत. याच दुकानच्या शेजारील मोबाईल शॉपी मधील मोबाईल हेडफोन चार्जर आदी वस्तू चोरट्यांनी चोरल्या आहेत.
किराणा दुकान फोडून या दुकानातील शिडीने नेऊन शेजारील नाईक शॉपिंग सेंटर मधील दुकाने फोडल्याने ही चोरी करणारे चोर याच परिसरातील असल्याचे निष्पन्न होत आहे. आधी पाळत ठेवून त्यानंतर हा चोरीचा कट यशस्वी करण्यात चोरट्यांना यश आले असून वेळापूर मध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होत असून या ठिकाणचे पोलीस अधिकारी मात्र ही चोरी रोखण्यात अपयशी ठरले आहेत.
◆ अधिकारी बदलण्याची ग्रामस्थांची मागणी
वेळापूर पोलिस स्टेशनचे अधिकारी अजूनही वेळापूर परिसरातील चोऱ्यांना रोखण्यात यशस्वी ठरले नसल्याने व दिवसेंदिवस या चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने या ठिकाणी अधिकारी बदलून हे चोरी सत्र उघड करणारे व रोखणारे सक्षम अधिकारी या ठिकाणी यावेत अशी अपेक्षा वेळापूरचे ग्रामस्थ करीत आहेत.
No comments