आला उन्हाळा : मुंबई तापली, पारा ३८ अंशावर
मुंबई शहरात आज (सोमवार) विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. 38.1 अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे.
फेब्रुवारी महिन्यातील मागच्या 10 वर्षांतील तिसरं उच्चतम तापमान असल्याचे तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे. फेब्रुवारी महिन्यातील सामान्य तापमानाच्या तुलनेत सोमवारचं तापमान जवळपास 7 अंश सेल्सियसने जास्त होतं. सांताक्रुझमध्ये 38.1 तर कुलाब्यात 34.7 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आलं. फेब्रुवारीतील आतापर्यंत सगळ्यात जास्त तापमान 1966 साली 39.6 इतकं नोंदवलं गेलं होतं.
No comments