दिल्ली आक्रोश करतेय, अमित शहा कुठे आहात?: शिवसेना



आर्थिक नुकसान आणि बळींच्या आकड्यांच्या माध्यमातून दिल्लीच्या दंगलीची भयानकता पुढं येऊ लागल्यानं राजकारण तापलं आहे. शिवसेनेनं याच मुद्द्यावरून भाजपला पुन्हा एकदा घेरलं आहे. 'वीर सावरकरांच्या गौरवासाठी जे राजकीय नौटंकी करीत आहेत, त्यांनी देशाच्या गौरवाचा विचार करावा. राजधानीतला हिंसेचा धूर देशाला गुदमरून टाकत आहे. त्या धुरात देशाचे गृहमंत्री कुठेच दिसत नाहीत. ते कुठे आहेत,' असा खडा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

No comments