प्लॅस्टिक मुक्त अकलूज साठी युवासेना आक्रमक



दि २५ जानेवारी २०२० रोजी प्लास्टिक बंदी करण्यात यावी असे निवेदन अकलूज ग्रामपंचातला देण्यात आले होते,त्यावरती ग्रामपंचायतीने कसलीही कार्यवाही केली नाही म्हणून युवासेना अकलूज शहराच्या वतीने गटविकास अधिकारी माळशिरस यांना निवेदन देण्यात आले असे की,अकलूज शहरातील सर्व व्यापारी वर्गाला प्लास्टिक वापरू नये.असे आदेश द्यावेत कोणताही व्यक्ती,व्यापारी, प्लास्टिक वापरताना आढळल्यास त्यांच्याकडून शासनाच्या नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी.अशी मागणी आम्ही २५ जानेवारी २०२० रोजी निवेदनाद्वारे अकलूज ग्रामपंचायतीकडे केली होती.परंतु प्लास्टिक बंदीवर्ती ग्रामविकास अधिकारी अकलुज यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही किंवा कार्यवाही साठी कोणताही साधा  प्रयत्न केलेला दिसुन येत नाही...
अकलूज ग्रामपंचायतीने प्लास्टिक बंदी कायद्याचे उल्लघण केलेले आहे.असेच दिसते व आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली अकलूज परिसरातील सर्वच लहान,मोठे व्यापारी,मंडई,चिकन विक्री,हॉटेल,यांचा प्लास्टीकचा वापर बेसुमार चालू आहे.प्लास्टिकचा अतिवापर असलेमुळे गावातील भटके जनावरे,गाई मरणाला बळी पडत आहेत.तरी ग्रामपंचायतीच्या अधिकारी यांचा व्यापारी वर्गावर्ती कसलीही वचक नाही.अधिकारी व व्यापारी यांचे संगनमत चालू असल्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही.युवासेना अकलूज शहराच्या वतीने आम्ही प्लास्टिक बंदी करा या मागणीसाठी निवेदन देऊनही  तरीही प्लास्टिक बंदीवर अद्याप ग्रामविकास अधिकारी यांनी कोणत्याही प्रकाराची कार्यवाही ग्रामपंचायतीने केलेली नाही.यापुढे आमच्या मागणीचा विचार न झाल्यास आम्ही ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाईची मागणी आंदोलनाद्वारे करणार आहोत.तसेच आमच्या मागणीचा विचार तातडीने करावा. ही नम्र विनंती.

कोणत्याही व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा हेतू नाही परंतु प्लास्टिक बंदीला आमचा विरोध आहे.
आमच्या मागण्या,
१) शहरात हॉटेल,व्यापारी व घरोघरी सुका व ओला कचरा वेगळा ठेवण्यास डस्टबीन वापरण्यास सांगा.
२) प्रत्येक चौकांनमध्ये प्लास्टिक बंदीचे बोर्ड लावा व झाकण असलेले डस्टबीन बसवा.

       

No comments