अर्थशास्त्र अधिवेशनात कु.सपना चव्हाण हिचे कौतुक
सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे 15 वे वार्षिक अधिवेशन रयत शिक्षण संस्थेचे , कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपुर ( स्वायत्त ) या ठिकाणी संपन्न झाले .
माजी उपप्राचार्य आर थोरात सर यांच्या हस्ते करण्यात आले.
अधिवेशनाचे अध्यक्ष मा . डाॅ संग्राम चव्हाण सर ( अर्थशास्त्र विभागप्रमुख वालचंद महाविद्यालय सोलापूर )
उदघाटन समारंभाचे अध्यक्ष मा . डाॅ अशोक भोईटे सर,प्राचार्य .क .भा . पा . महा - पंढरपुर प्रा . उत्तमराव हुंडेकर , प्रा.डाॅ राजाराम पाटील होते.
या परिषदेमध्ये अनेक वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थानी शोधनिंबध सादरीकरण केले . त्यामध्ये पिलीव येथील कु . सपना बाळू चव्हाण या संशोधन विद्यार्थिनीने , माळशिरस तालुक्यातील वेळापुर या गावाचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास या विषयावर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शोधनिंबध सादरीकरण करून सर्व मान्यवरांचे मन जिंकले.
सपना चव्हाण हिने मनोगत व्यक्त करताना सांगितले की आज ती या यशापर्यत पोहचले त्या पाठिमागे अर्थशास्त्र परिषद वार्षिक अधिवेशन आहे . यामुळे आम्हा विद्यार्थाना शोधनिंबधाची गोडी लागली आहे .आज संशोधन विद्यार्थी म्हणुन आम्ही पुढे येत आहे
याविषयी डाॅ .संतोष कदम सर यांनी सपना हिचे कौतुक केले , त्यांनी म्हटले की चव्हाण हिला आम्ही नेहमी पाहत आलो आहे ती किती छान शोधनिंबध तयार करून सादरीकरण करते , K.B.P.COLLEGE चा एक input भाग आहे की सपना हिने स्वतः ची अोळख निर्माण केली आहे असे सांगितले.
सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद आणि रयत शिक्षण संस्थेचे क. भा .पा महा - पंढरपुर ,प्रा भोईटे सर , तसेच अर्थशास्र विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग यांचे सपना हिने आभार मानले .
No comments