शिवजयंती । सोलापूरात १० हजार मातांनी गायला शिवबाचा पाळणा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९० व्या जयंतीनिमित्त आज देश आणि राज्यभरात महाराजांच्या जयंतीचा उत्सव साजरा केला जात आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र रात्री एक आगळावेगळा शिवजन्मोत्सव साजरा केला गेला. मध्यरात्री १२ वाजता पाळणा झुलवत महाराजांच्या जन्माचा सोहळा साजरा केला. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा जन्मोत्सव विक्रमी असा आहे. १० हजार माता-भगिनींनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पाळणा गीत गात छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली.

No comments