निमगाव मधून चंदनाच्या झाडांची चोरी
(संग्रहित छायाचित्र)
माळशिरस तालुक्यातील वेळापूर पोलीस ठाणे हद्दीतील निमगाव (म) येथून दोन चंदनाच्या झाडांची चोरी झालि असून याबाबत वेळापूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत बाळासाहेब आप्पासाहेब मगर यांनी दिलेल्या फिर्यादि नुसार,
निमगांव ( म ) ता . माळशिरस येथे शेती गट नंबर 931 / 2 शेतातील विहिरीवर चंदनाची झाडे उगविलेली होती. कामानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर निमगाव ( म ) ता . माळशिरस येथील माझे शेती गट नंबर 931 / 2 या गटा मधील विहिरीवरील सुमारे 25 वर्षे वयाची दोन चंदनाची झाडे त्यामधील 14 किलो वजनाचा गर 28 , 000 / - रूपये किमतीचा कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत.
याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध वेळापूर पोलिसांत भादवि ३७९ नुसार गुन्हा नोंद झाला आहे.
गेल्या काही दिवसांत वेळापूर व परिसरात घरफोड्या, दुकान फोड्या, दुचाकी चोरीचे सत्र सुरू असून आता चंदन चोरी ने तालुक्यात वेगळी चर्चा सुरू झाली आहे. असे असले तरी पोलिसांना या चोऱ्यांचा तपास लावण्यास अद्यापही यश आले नाही.
No comments