पत्रकारिता करत समाजात मोठा बदल घडवता येतो : उत्तमराव जानकर

पत्रकारिता करत असताना समाजातील प्रश्न प्रशासनापुढे आणून समाजात मोठा बदल घडवता येतो, पत्रकारिता करताना एक प्रकारची समाज सेवाच होत असते असे विचार लोकनेते उत्तमराव जानकर यांनी व्यक्त केले. 
उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमंत बनकर यांचा आज गरुड बंगला वेळापूर येथे सन्मान करण्यात आला. यावेळी जानकर बोलत होते. 
यावेळी वेळापूर गावचे उपसरपंच जावेद मुलाणी, मोहन कचरे, सतीश मदने, बाळासाहेब मगर आदी उपस्थित होते.

No comments