वेळापूरला शिवजयंती निमित्ताने भव्य मिरवणूक
शिवजयंती निमित्ताने वेळापूर, ता. माळशिरस येथे उत्सव कमिटीने भव्य मिरवणूक काढली. यावेळी हजारो तरुणांनी या मिरवणुकीत सहभाग घेत जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला.
प्रारंभी सपोनि दीपक जाधव यांचे हस्ते पालखी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रथाची पूजा करण्यात आली. त्यानंतर वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य दिव्य मिरवणूक बस स्थानक, त्रिमूर्ती चौक, व्यापारी पेठ मार्गे जुने बाजार तळ, महादेव मंदिर व पालखी चौक येथे येऊन थांबली.
युवा नेते स्वप्नील माने देशमुख, पै. सचिन चव्हाण, पै. निखिल चव्हाण, पै. शिवराज देशमुख, पै. योगेश शेटे, भैय्या मांडवे, नितीन वाघमोडे यांच्यासह अनेक शिवभक्तांनी मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
No comments