अकलूजच्या त्रिमूर्ती चषकावर माऊली कोकाटे याने कोरले नाव

शिवरात्री निमित्ताने अकलूज ला घेण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेच्या  ञिमुर्ती चषकावर अकलूजच्या माऊली कोकाटेने कोल्हापुरच्या अक्षय मंगवङेवर १० विरुध्द ० गुणांनी मात करत आपले नाव कोरले. 
माऊली कोकाटेला रोख ७१ हजार रुपयांचे बक्षिस माजी उपमुख्य मंञी विजयसिंह मोहीते-पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. उपविजेत्या अक्षयला रोख २५ हजार रुपये देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे बक्षिस रविंद्र शेंङगे (टेंभुर्णी) १५ हजार, चतुर्थ क्रमांक भैया चव्हाण (अकलूज) याला मिळाले.

विजेत्यांना सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहीते-पाटील, मदनसिंह मोहीते-पाटील, धैर्यशिल मोहीते-पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. सदरच्या स्पर्धा सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती, महाशिवराञ याञा महोत्सव समिती व प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या.


No comments