वेळापूर पत्रकार संघाकडून बनकर यांचा सत्कार

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग जिल्हा ग्रामीण विकास  यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान  सोलापूर यांच्या वतीने आयोजित रुकमिणी जत्रेत दैनिक पुण्यनगरीचे माळशिरस तालुका  प्रतिनिधी श्रीमंत भगवान बनकर यांना माळशिरस तालुकास्तरिय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सोलापूर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांच्या हस्ते देण्यात आला होता. 
त्यांच्या या यशाबद्दल आज वेळापूर येथे वेळापूर पत्रकार संघाकडून सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष गणेश जामदार, सूर्यकांत भिसे, दिलीप बनसोडे, किरण जाधव, डी एस गायकवाड, ओंकार आडत, शिवाजी मंडले उपस्थित होते. 

No comments