राष्ट्रीय ललित कला पुरस्कार 2020

​ 

- राष्ट्रपती राम नाथ कोविंद ह्यांच्या हस्ते 4 मार्च 2020 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात 15 गुणवंत कलाकारांना 61वे ‘वार्षिक ललित कला अकादमी पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.

▪️स्वरूप
-  विजेत्यांना पुरस्कारस्वरूपात थाळी, शाल आणि एक लक्ष रुपये रोख बक्षीस देण्यात आले.

▪️पुरस्कार विजेते कलाकारांमध्ये- 
 १) अनुप कुमार मनझुखी गोपी, २) डेव्हिड मलाकार, ३) देवेंद्र कुमार खरे,४)  दिनेश पंड्या, ५) फारुक अहमद हलदर, ६) हरी राम कुंभावत,७)  केशरी नंदन प्रसाद, ८) मोहन कुमार टी.,९)  रतन कृष्ण सहा, १०) सागर वसंत कांबळे,११)  सतविंदर कौर, १२) सुनील थिरूवायूर, १३ )तेजस्वी नारायण सोनावणे, १४) यशपाल सिंग  १५)  यशवंत सिंग यांचा समावेश आहे.

- या कलाकारांच्या कलाकृती 22 मार्च 2020 पर्यंत नवी दिल्लीत ललित कला अकादमीच्या कलादालनात 61 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनीत ठेवण्यात आल्या आहेत.


▪️ललित कला अकादमी

- ललित कला अकादमी याची स्थापना 5 ऑगस्ट 1954 रोजी एक स्वायत्त संस्था म्हणून करण्यात आली, ज्याला 1957 साली वैधानिक दर्जा दिला गेला.

- ललित कला अकादमी दरवर्षी कलेला आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कला प्रदर्शन आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करते.

No comments