स्वतःचा व्यवसाय सुरू करून भरारी घ्या : उत्तमराव जानकर
दुसऱ्याच्या हाताखाली राबण्यापेक्षा स्वतःच स्वतःचा व्यवसाय धंदा सुरू करून या जगात एक भक्कम भरारी घ्या असे विचार राष्ट्रवादी चे नेते उत्तमराव जानकर यांनी वेळापूर येथे बोलताना व्यक्त केले.
ग्रामीण युवा उद्योजकता प्रशिक्षण केंद्र अंतर्गत बंदिस्त शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण वेळापूर येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते.
ग्रामपंचायत वेळापूर च्या सभागृहात हे प्रशिक्षण संपन्न झाले. यामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थीना शासकीय योजना, अनुदान, प्रोजेक्ट रिपोर्ट, गोठा व्यवस्थापन, काळजी, यांसारख्या अनेक मुद्द्यांवर प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी देव गोसकी, उपसरपंच जावेद मुलाणी, गटनेते पांडुरंग आण्णा मंडले, भुसारे वस्ताद आदी उपस्थित होते.
No comments