akluj । युवासेनेच्या वतीने पक्षांसाठी झाडांवर मडकी बांधून पाणपोई


२० मार्च जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून युवासेनेचा स्तुत्य उपक्रम

 सध्या सर्वत्र कोरोना रोगाने थैमान घातले आहे. सर्वांनी स्वतः बरोबर इतरांची काळजी घेणं गरजेचं आहे.पण 
उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत.आपण कोरोना मुळे स्वतः ची काळजी करत आहेत. पण ऐन उन्हाळ्यात पक्षांची पण काळजी करायला पाहिजे.वाढत्या तापमानामुळे पशुपक्षी सैरभैर झाली असल्याने युवासेना अकलूज शहर प्रमुख यांनी चिमणी दिनाच्या निमित्ताने महषीॅ काॅलनी अकलूज येथे झाडांवरती पक्षांना पाणी पिण्यासाठी मडकी बांधली. पशु पक्षी यांना भर उन्हाहाळ्यात गार पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे या उद्देशाने पाणपोई सुरू करताच चिमणी चिऊताई लगेच पाणी पिण्यासाठी तिथे आली जणू काय  युवासैनिकांची पाणी ठेवण्याची वाटच बघत होती.तुम्ही पण घराच्या भवताली झाडांवर.भिंतींवर पक्षांसाठी पाणी ठेवा असे आवाहन अकलूज शहर युवासेना प्रमुख शेखरभैया खिलारे यांनी केले आहे

No comments