अकलूज । महिला दिनानिमित्त मुलींना सायकल वाटप
शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज
प्राध्यापक व माजी विद्यार्थी असोशिएशन च्या वतीने महिला दिनांचे निमित्ताने मुलींसाठी सायकल बॅंकच्या वतीने सायकल वाटप करण्यात आले.
महाविद्यालयातील माजी विद्यार्थी व प्राध्यापक यांनी एकत्र येवून महाविद्यालया शिकत असलेल्या दूर अंतरावरून येणारया मुलीसाठी निधी एकत्र केला त्या निधीतून सायकल बॅक ही योजना तयार केली व त्या योजनेतून आज १७ सालकलचे वाटप शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालीका मा कुमारी स्वरूपाराणी मोहिते पाटील यांचे शुभहस्ते करणेत आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ आबासाहेब देशमुख, डाॅ विश्वनाथ आवड , डाॅ दत्तात्रय बारबोले, डाॅ अपर्णा कुचेकर व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थीत होते.
No comments