कासेगाव येथील दिलीप डूणे यांना राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्कार जाहीर

 “ महाराष्ट्र फौंडेशन " चा  राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्कार सन 2020 कासेगाव येथील दिलीप डूणे यांना जाहीर झाला आहे. 
शेतीतील नवनवीन प्रयोग, यशस्वी उत्पादन यामुळे हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
" महाराष्ट्र फाँडेशन " ही संस्था सामाजिक , शैक्षणिक , सास्कृतिक , कला , क्रीडा , कृषि क्षेत्रात गेली पाच वर्षापासून कार्यरत आहे . “ महाराष्ट्र फाँडेशन " सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त " महाराष्ट्र फौडेशन " राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रात कार्य करणा - या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येत आहे . 
 हा कार्यक्रम - रविवार दिनांक - 8 मार्च 2020 , दुपारी 3 . 00 वा . कार्यक्रम स्थळ - डॉ . निर्मिल कुमार फडकुले सभागृह ( NC सभागृह ) सिध्देश्वर मंदिरा शेजारी , सोलापूर येथे पार पडणार आहे.

No comments