सृष्टी फाउंडेशनच्या वतीने महिला दिन उत्साहात
सृष्टी फाउंडेशन फडतरी यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त बचत गटाच्या महिलांना सृष्टीदिनदर्शीकेचे वाटप पंचायत समिती माजी सभापती सौ वैष्णवीदेवी अर्जुनसिह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्या मंगलताई वाघमोडे, पंचायत समिती सदस्या हसीना शेख, सह. गटविकास अधिकारी शिवाजी पाटील , सृष्टी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत सोरटे,शासकीय योजना सल्लागार सचिन साबळे, संदीप साबळे, पूनम लाळगे, चैत्राली पंचवाघ, सृष्टी फाउंडेशनच्या सर्व संचालिका व महिला बचत गटाच्या अध्यक्षा, उपअध्यक्षा, सचिव व गटातील सदस्या उपस्थित होत्या.
No comments