लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनभाऊ साठे यांचे वेळापूरात जंगी स्वागत
छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा अकलूज यांच्यावतीने अकलूज येथे शाहिर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांना निमंत्रित करण्यात आले होते पंढरपूर हून वेळापूर मार्गे अकलूज येथे जात असताना वेळापूर बस स्थानक येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक याठिकाणी वेळापूरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्यावतीने आणि सकल मातंग समाजाच्या वतीने सचिनभाऊ साठे यांच्या समवेत नतुन नगरसेवक कृष्णा वाघमारे यांचे ही फटाक्यांची आतिषबाजी करून जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी सचिनभाऊ साठे म्हणाले की, येत्या काळामध्ये लवकरच राज्य व्यापक बैठक बोलावून मातंग समाजाच्या असणाऱ्या प्रश्नांना आणि होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले जाणार आहे. २०२० हे वर्ष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष म्हणून राज्यामध्ये साजरा होत आहे.या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन तसेच गेली काही वर्ष भ्रष्टाचारामध्ये गुरफटलेले अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ पुन्हा नव्याने अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची उभारणी करून त्यासाठी लवकरात-लवकर निधी उपलब्ध करून द्यावा त्यामुळे समाजातील बेरोजगार सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी फायदा होईल. त्याचबरोबर मातंग समाजाच्या आरक्षणासाठी संजयभाऊ ताकतोडे यांनी दिलेले बलिदान व्यर्थ न जाऊ देता त्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा महत्वपूर्ण विषयांवरती त्यांनी यावेळी चर्चा केली.
No comments