रत्नत्रय पतसंस्था सदाशिवनगर । १६ वा वर्धापन दिन उत्साहात

रत्नत्रय पतसंस्था सदाशिवनगर यांच्या 16  व्या वर्धापण दिनानिमित्त व महिला जागतिक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण समारंभ पंचायत समिती माजी सभापती सौ वैष्णवीदेवी अर्जुनसिह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद सदस्या मंगलताई वाघमोडे, संगीताताई मोटे, पंचायत समिती सदस्या हसीना शेख, सदाशिवनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच आशाताई ओवाळ, पूरदावडे सरपंच देविदास ढोपे, रत्नत्रय पतसंस्था संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी, शंकर साखर कारखाना संचालक रामदास कर्णे, सदाशिवनगर पोलीस पाटील अपर्णा लोंढे, शिवराज निंबाळकर, रत्नत्रय पतसंस्थाचे चेअरमन वीरकुमार दोशी, रत्नत्रय पतसंस्थाचे व्हा.चेअरमन संजय गांधी, सचिव ज्ञानेश राऊत, प्रमोद दोशी व रत्नत्रय पतसंस्थाचे सर्व संचालक, सर्व सभासद व सर्व महिला व सदाशिवनगर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments