वेळापूर । पालखी चौकातील गणपती मंदिरातील दानपेटी गेली चोरीला
वेळापूर, ता. माळशिरस येथील पालखी चौकातील श्री सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती मंदिरातील दानपेटी रात्रीच्या वेळेस अज्ञात चोरट्यानी चोरली आहे.
या दानपेटी मध्ये दोन चांदीच्या मुर्त्या व गणपती च्या गळ्यात घातले जाणारे सोन्याचे जानवे असल्याची माहिती मंडळाच्या पदधिकार्यांनी दिली आहे.
पालखी चौकात रात्रीही वाहनांची ये जा असते तसेच या परिसरात नेहमीच वर्दळ असते मात्र असे असताना चोरट्यानी ही मोठी चोरी घडवून आणल्याने वेळापूर व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वेळापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पंचनामा केला आहे.
No comments