राज्यातील २०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी
आज १८७ नवीन रुग्णांचे निदान; राज्यातील एकूण रुग्णसंख्या १७६१ - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
राज्यात आज कोरोनाच्या १८७ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या १७६१ झाली आहे. कोरोनाबाधित २०८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १४२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ हजार ७७१ नमुन्यांपैकी ३४ हजार ९४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर १७६१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २०८ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
No comments