सोलापूर जिल्ह्यात जनजागृती रथ व पोलीस संचलन

 
 घरी राहा, सुरक्षित राहा, आरोग्यदायी राहा असा संदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या  सोलापूर येथील क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरोच्यावतीने शहर व जिल्ह्यामध्ये  पाच मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून देऊन जनजागृती करणेत येत आहे.-देशामध्ये  व राज्यामध्ये मोठया प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. द‍िवसेंद‍िवस कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. यावरती प्रभावी उपाय म्हणजे जनतेने घरामध्ये राहणे हे आवश्यक आहे. द‍िनांक १४ एप्रिल २०२० पर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. जीवनावश्यक गोष्टी व मेडीकल व अत्यावश्यक सेवा श‍िवाय कोणीही घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात  येत आहेत. सदरील वाहनाच्या माध्यमामातून  पोल‍िस अधिकारी फेरी काढून जनतेमध्ये  संदेश देत आहेत. घराबाहेर पडल्यास  कोरोना विषाणूचा अधिक प्रसार होईल म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी असा संदेश देण्यात येत आहे. सदरील पाच मोबाईल  व्हॅनच्या माध्यमातून सोलापूर शहरासह सर्व तालुक्यामध्ये जनजागृती अभियान खालीलप्रमाणे राबविण्यात येत आहे.  द‍ि.१०/४/२० रोजी उत्तर सोलापूर सोलापूर तालुक्यातील  बेलाटी, डोणगांव, पाथरी, त‍ि-हे, सोरेगांव, कुमठे द‍ि.११/४/२० रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर, होनमुर्गी, टाकळी, मंद्रुप, कंदलगांव, तेलगांव द‍ि.१२/४/२० रोजी कुंभारी, तीर्थ, वळसंग, आचेगांव, होटगी, होटगी स्टेशन द‍ि.१३/४/२० रोजी मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर, वडवळ नागनाथ, मोहोळ, सयद वरवडे, कामती खुर्द, कामती बुद्रुक द‍ि.१४/४/२० रोजी अक्कलकोट  तालुक्यातील कर्जाळ, अक्कलकोट  शहर, जेऊर, मंगरुळ, तडवळ, सुलेर जवळगे ई.

No comments