करोना रोखण्यासाठी धार्मिक स्थळांचा पैसा ताब्यात घ्या: आंबेडकर



काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व धार्मिक स्थळाचं सोनं ताब्यात घेऊन तो पैसा करोना रोखण्यासाठी वापरावा अशी मागणी केली होती. चव्हाण यांच्या पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही तशीच मागणी केली आहे. देशातील धार्मिक स्थळे ही सरकारची मालमत्ता आहे. त्यामुळे सरकारने या धार्मिक स्थळांचा सर्व पैसा ताब्यात घेऊन गोरगरिबांसाठी वापरावा, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.


No comments