माळशिरस तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस, आंबा बागेचे मोठे नुकसान
माळशिरस तालुक्यात सर्वत्र सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. दुपार पासून आकाशात ढगांची गर्दी गोळा झाली होती. पाच च्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरूवात झाली.
या पावसामुळे तालुक्यातील व परिसरातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वारा एवढा जोरात होता की अनेक बागा जमीनदोस्त झाल्या आहेत तर आधीच कमी फळे असताना आता जी काही फळे शिल्लक होती ती ही या वाऱ्यामुळे गळून पडली आहेत.
अनेक ठिकाणी मोठं मोठी झाडे पडण्याच्या घटना ही घडल्या आहेत.
No comments