कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांकडून निम्मेच शुल्क घ्यावे : आमदार सुनील शेळके


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या सर्व शैक्षणिक संस्थांनी सर्वसामान्य विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक वर्षाचे पूर्ण शालेय शुल्क न घेता निम्मेच शालेय शुल्क घेवून पालकांना आधार द्यावा. तसेच, नवीन प्रवेश प्रक्रिया करताना ‘डोनेशन’ अथवा विकास निधीसुद्धा कमी करावी अशी मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली आहे.

No comments