अंतिम वर्षाच्या परिक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह ! राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र

Question marks again on final year exams!  Written letter of the Governor to the Chief Minister
ठाकरेसरकारने घेतलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना त्याबाबत लेखी पत्र लिहिलेले आहे.

यामध्ये अंतिम वर्षाची परीक्षा रद्द झाली तर याचे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होणार असल्याचे त्यांनी लिहिले आहे. तसेच अंतिम वर्षाच्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार होणार की नाही यावर निर्णय होईल असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार ने घेतलेला हा निर्णय रद्द होतो की काय? असे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या गोंधळामुळे अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहेत.

No comments