जि. प. अध्यक्षांचा माळशिरस तालुका दौरा

Solapur-z-p-president-visit-malshiras-taluka-for-covid-19
जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी आज माळशिरस तालुक्याचा दौरा केला. यामध्ये त्यांनी  वेळापूर येथील कोविड केअर सेंटरला भेट दिली. 
यावेळी उपविभागीय अधिकारी माननीय शमा पवार, तहसीलदार अभिजीत पाटील,नायब तहसीलदार तुषार देशमुख,ज्ञानेश पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.बापू ओव्हाळ, समन्वयक डॉ.अनिरुद्ध पिंपळे अकलूज जिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर सौ खडतरे तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर श्रेणिक शहा उपस्थित होते.
माननीय अध्यक्ष यांनी यावेळी रुग्णांशी चर्चा करून सोयीसुविधा बाबत माहिती घेतली व समाधान व्यक्त केले.

अकलुज येथे काल नवीन सापडलेल्या कोराना पोजिटीव्ह रुग्णांची आरोग्यवर्धिनी केंद्र महाळुंग च्या कोव्हीड केअर सेंटरमधे विचारपुस करताना जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सोबत अजित तळेकर,महाळुंगचे सरपंच विजय भोसले, ज्ञानेश पवार,सागर यादव,बजरंग भोसले,कोव्हीड सेंटरचे इनचार्ज,कोव्हीडकेअर सेंटरचे कोर्डीनेटर डाॅ अनिरुध पिंपळे,डाॅ समीर शेख,स्वॅब केलेक्शन चे सुनील वाघमारे आदि उपस्थीत होते.
महाळुंगच्या कोव्हीड केअर सेंटरमधे मिळणार्या आरोग्य सेवा,स्वच्छता अतिशय उच्च दर्जाच्या असुन पोजिटीव्ह रुग्ण आणि कोरांटाईन रुग्ण मिळणार्या आरोग्यसेवेवर समाधानी दिसले.

No comments