भाजप कडून तरंगफळ च्या दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला मदत

BJP-helps-Tarangphal-bereaved-family
आज माळशिरस तालुक्यातील तरंगफळ येथील गॅस स्फोट होऊन निधन झालेल्या ठिकाणी आमदार राम सातपुते यांनी भेट दिली. या दुर्घटनेत आई आणी दोन लहान लेकरांचा मृत्यु झाला. 
या परिवारातील सदस्यांचे आमदार राम सातपुते यांनी सांत्वन केले. माळशिरस तालुक़ा भाजपाच्या वतीने या कुटूंबास संसारउपयोगी साहित्याची मदत करण्यात आली. याप्रसंगी भाजपा तालुक़ा अध्यक्ष सोपानराव नारनवर , सरचिटणीस संजय देशमुख  आणी नागरिक ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यातील तंरगफळ येथे घरगुती गँसचा स्फोट झाला असून या स्फोटात एकजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर दोघे गंभीरपणे भांजले आहेत.जखमीना सोलापुर येथिल शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते तेथे त्या दोघांचा ही मृत्यू झाला होता. 

No comments