पैलवान ग्रुप च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी सचिन चव्हाण यांची निवड

Sachin-Chavan-elected-as-West-Maharashtra-President-of-Pailawan-Group
पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य, संस्थापक / अध्यक्ष पै मारुती ( भाऊ ) जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पैलवान ग्रुप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी पै सचिन  ( भाऊ ) चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. 
पै सचिन चव्हाण हे एक नामवंत मल्ल असून अनेक मानाच्या कुस्त्या त्यांनी जिंकल्या आहेत तसेच फक्त कुस्ती क्षेत्रात नाही तर सामाजिक क्षेत्रातील त्यांचे भरीव योगदान आहे. 
लॉक डाऊन काळात गोर गरिबांच्या मुलांना कुस्तीचे धडे देण्यासाठी त्यांनी आपल्या घरी कुस्तीचा आखाडा ही तयार केला असून त्यामध्ये ते स्थानिक मुलांना कुस्तीचे धडेही देत आहेत. 
पै सचिन चव्हाण यांचे निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. 

No comments