मराठी भाषा अवगत असणे ही काळाची गरज : सौ.वैशाली बनकर
लोकविकास मराठी मिडीयम स्कूल ,वेळापूर येथे ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर. उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळेस कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेच्या अध्यक्षा वैशाली बनकर व सचिन बनकर यांनी केले.अध्यक्षा यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषा अवगत असणे ही काळाची गरज आहे कारण इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे मुलांचा ओढा सध्या चालू आहे, मराठी ही आपली मातृभाषा भाषा असून तिच्याकडे दुर्लक्ष होवू नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे असे सांगितले. आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. कुसुमाग्रज यांच्या जीवनावर संग्राम भोंग यांने भाषण केले. व गौरी पवार हिने मराठी भाषा गौरव दिन या विषयी भाषण केले. प्रतिज्ञा जाधव हीने कुसुमाग्रज व मराठी भाषा गौरव दिनाविषयी महत्व सांगितले.
कार्यक्रमास प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक सुनील पताळे राया वाघमारे तसेच अजित बनकर, सचिन जाधव, ज्ञानेश्वर पताळे , सिन्नापा शेंडगे, नितीन माने , विठ्ठल वाघे, ओंकार माळवदकर, विजया चापले, कल्पना पांढरे, अरुणा बनसोडे ,यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नाली माने देशमुख प्रास्ताविक रिया माने देशमुख अनुमोदन प्रांजली एकतपुरे तर आभार सायली अडसूळ हिने मानले.
No comments